Latest Bollywood Update | विराट ची परी सगळ्यांना घाबरवणार | होळी ला भेटेल हि परी | Lokmat News

2021-09-13 0

इटलीत शाही लग्न, फिनलँडमध्ये मधुचंद्र, दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन आणि नंतर केपटाउनचा दौरा, असा भरगच्च कार्यक्रम आटोपून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आता नव्या जोमाने कामाला लागली आहे. अनुष्काने स्वतःचीच निर्मिती असलेल्या 'परी' या सिनेमाचं एक मोशन पोस्टर शेअर केलं आहे. त्यातलं तिचं रूप आपल्याला घाबरवणारं आहेच, पण विराट कोहलीही तिचा हा भयंकर अवतार पाहून घाबरून जाईल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीय.'होली विथ परी' असं या व्हिडिओचं शीर्षक आहे. त्यातील अनुष्का आपल्याकडे रोखून बघतेय. आपणही तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहतो आणि तिचा रक्तबंबाळ चेहरा पाहून हादरतो. या मोशन पोस्टरमध्ये एक रहस्य, थरार आहे. त्यामुळे 'परी'बद्दलची उत्सुकता चांगलीच ताणली गेलीय

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires